Arnold Dix : ऑस्ट्रेलियावरुन आले 41 मजुरांना वाचवलं, सर्वांसाठी देवदूत बनलेले अर्नॉल्ड डिक्स आहेत तरी कोण? जाणून घ्या…

Arnold Dix : गेल्या काही दिवसांनंतर उत्तराखंडमधील उत्तराकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर काल सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. देशातील तसेच विदेशातील पथकाने मोठे कष्ट घेतले.

असे असताना सध्या एक परदेशी तज्ज्ञाचा फोटो व्हायरल होत आहे. यांचे नाव म्हणजे आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स. सध्या त्यांची सर्वत्र चर्चा आहे. सर्व कामगारांच्या सुटकेसाठी त्यांनी बाबा बौख नाथ देवतेकडे प्रार्थना केली होती.

देवाने त्यांची प्रार्थना स्वीकारली आणि त्यानंतर त्यांनी बाबा बौख नाथ देवतेचे आभार मानले आहेत. याचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. या कामगारांना वाचवण्यासाठी परदेशी तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली. त्यात अर्नोल्ड डिक्स यांचं नाव अग्रेसर होत.

याबाबत ते म्हणाले, मी सुरुवातीला म्हणालो की, 41 लोक सुखरुप आहेत आणि ख्रिसमसमुळे कोणालाही दुखापत होणार नाही. ख्रिसमस लवकर येत आहे. आम्ही एक अद्भुत संघ म्हणून काम केले. भारताकडे सर्वोत्तम अभियंते आहेत.

भारतीय लष्कर आणि प्रशासन सर्वांचे हे यश आहे. या यशस्वी मोहिमेचा भाग बनणे, हे माझं भाग्य आहे. मी मंदिरात जाणार आहे कारण, मी जे घडले त्याबद्दल देवाला धन्यवाद करण्याचे वचन दिले होते, असेही ते म्हणाले.

दरम्यान, अर्नोल्ड डिक्स भूमिगत बांधकामाचे आंतरराष्ट्रीय सल्लागार आहेत. सर्व भारतीयांप्रमाणे त्यांनीही मजुरांच्या सुटकेसाठी देवाकडे प्रार्थना केली होती सिल्क्यरा बोगद्याच्या बाहेर असलेल्या बाबा बोथ नाग देवतेसमोर त्यांनी हात जोडले होते, त्यांनी देवाचे आभार मानले.

अर्नोल्ड डिक्स यांनी कामगारांना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यांनी कामगारांना बोगद्यातून बाहेर काढले. अर्नोल्ड डिक्स भूमिगत आणि वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये तज्ज्ञ आहेत. अशा प्रकारे काम करण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे.