विजयकांतच्या अंतिम संस्कारात थलापति विजयवर हल्ला, घटनेनंतर मोठा गोंधळ, नेमकं काय झालं?

प्रसिद्ध अभिनेते आणि राजकीय नेते विजयकांत यांचे नुकतेच निधन झालं. 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निधनाने तमिळ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

अनेक साऊथ कलाकारांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. त्यांचे पार्थिव अंतिम संस्कारांसाठी कोयंबेडू कार्यालयातून आयलँड ग्राऊंड अन्ना सलाई येथे ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी मनोरंजन क्षेत्रातील आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी त्यांच्या अंत्यदर्शनसाठी आली होती. दरम्यान, यावेळी एक विचित्र प्रकार घडला. प्रसिद्ध अभिनेता थलापति विजय याच्या भोवती चाहत्यांनी गराडा घातला. यामुळे याठिकाणी नेमकं काय सुरू आहे, हे समजत नव्हते.

यावेळी मोठ्या चेंगराचेंगरीतून विजयला त्याच्या कारपर्यंत पोहोचावे लागले. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने विजयला चप्पल देखील फेकून मारली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. याबाबत तपास केला जात आहे. याबाबत व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विजयकांत यांचे अंत्यदर्शन करून थलापति विजय बाहेर येत होता.

यावेळी पोलीस असताना देखील विजयचे चाहते या गर्दीत घुसले. विजय बाहेर येताच चारही बाजूंनी चाहत्यांनी गराडा घातला. या गराड्यात विजय अडकला. विजय कारपर्यंत पोहताच एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या दिशेने चप्पल फेकून मारली.

तो या गर्दीत चेपून गेल्याचे दिसून आलं. त्याने खाली मान घातली आहे त्याची सिक्युरिटी त्याला कारपर्यंत नेण्यासाठी ढकलत होती. या सगळ्यात विजय खूप त्रासलेला दिसत आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.