Bachchan Family : अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या रॉय यांच्यात जोरदार वाद? धक्कादायक कारण आलं समोर…

Bachchan Family : सध्या बॉलीवूडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा बच्चन कुटुंबाबरोबर वाद सुरु आहे की काय, अशी चर्चा सध्या मनोरंजनसृष्टीमध्ये सुरु आहे. याचे कारण देखील समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन त्यांचा नातू अगस्त्य नंदाचा पहिला चित्रपट ‘द आर्चीज’च्या प्रीमिअरमध्ये संपूर्ण कुटुंबासहीत उपस्थित होते. यानंतर अमिताभ बच्चन त्यांच्या सूनेवर फारच नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियापर्यंत हे वाद दिसून आले.

यामुळे मागील अनेक दिवसांपासून बच्चन कुटुंबामध्ये काहीतरी शिजत असल्याची चर्चा मनोरंजन सृष्टीमध्ये सुरु आहे. अमिताभ यांनी मुलगी श्वेता नंदाला काही दिवसांपूर्वीच आपला ‘प्रतीक्षा’ हा जुहूमधील बंगला भेट म्हणून दिला.

याची किंमत 50.63 कोटी रुपये इतकी आहे. यामुळे संपत्तीवरुन बच्चन कुटुंबामध्ये वाद सुरु आहे, असे म्हटले जात आहे. या वादामुळेच अमिताभ बच्चन फारच नाराज असून त्यांनी अगदी सोशल मीडियावरुन यासंदर्भातील संकेत दिले आहेत.

तसेच यानंतर अमिताभ यांनी आपल्या सुनेला ऐश्वर्या रायला अनफॉलो केल्याचे सांगितले जात आहे. अमिताभ आता ऐश्वर्या रायला फॉलो करत नाहीत. सध्या यासंदर्भातील स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. आता ऐश्वर्या सुद्धा अमिताभ यांना फॉलो करत नाही की आता तिने हा निर्णय घेतला आहे याबद्दल मतमतांतरे आहेत. 

दरम्यान, अमिताभ बच्चन आपल्या दमदार अभिनयामुळे ओळखले जातात. भारतामधील सर्वात यशस्वी आणि आजही तरुणांना लाजवेल इतक्या उत्साहाने काम करणारे अभिनेते म्हणून अमिताभ यांची ओळख जगभरात आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीत मोठे काम केले आहे.