Badlapur News: आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बदलापूर पूर्व परिसरात असलेल्या सुखकर्ता इमारतीत घडली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
याबाबत पत्नीसह सासरच्या ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत यश संजय गायकवाड असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याबाबत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे, अनुसूचीत जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये पत्नी, अंकिता यश गायकवाड, सासरा नागप्पा पुजारी, सासू शकुंतला, मेव्हणी प्रियंका आणि तिचा नवरा तसेच आर्वेश पुजारी, सागर अशी आरोपींची नावे आहेत. मृतक यश हा मुंबई एअरपोर्ट येथे नोकरीला होता. त्यातच गेल्या ७ ते ८ महिन्यापूर्वी कुर्ला भागात राहणाऱ्या अंकिता या तरुणीशी ओळख होऊन दोघात प्रेमसंबंध निर्माण झाले होते.
असे असताना या प्रेमाला अंकिताच्या घराचा विरोध होता. त्यामुळे अंकिताकडून मृत यशचा मोबाईल नंबर मिळवून त्याला अंकिताच्या घरच्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून तू आमच्या सावलीत राहणाच्या पण लायकीचा नाही, असे म्हटले. तरीही अंकीता त्याला चोरून भेटत होती.
त्यानंतर तिनेच त्याला लग्नासाठी होकार देत, लग्न करण्याची तयारी केली. दोघांनी लग्न करून पुन्हा बदलापुरात राहण्यास आले. एकदा तो पत्नीला भेटण्यासाठी गेला असता, त्याला सासरच्या मंडळीकडून अपमानास्पद वागणूक दिली गेली.
तू मर्द असशील तर घरी येशील नाहीतर आम्ही तुला #$* समजू’ असे बोलल्याने मृत यश पत्नीसह सासरच्या मंडळीकडून त्रासलेला होता. यामुळे नैराश्यातून २८ ऑक्टोबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.