बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक हरपला, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन, धक्कादायक माहिती आली समोर..

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना एक दिवसापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मुंबईतील पीडी हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांचे निधन झाले.

त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते, त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जोशी यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे मनोहर जोशी यांचा मुलगा उमेश यांनी सांगितले. त्याआधी त्यांचे पार्थिव माटुंगा येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना 21 फेब्रुवारी 2024 रोजी पीडी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.

शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांपैकी एक असलेले ८६ वर्षीय मनोहर जोशी यांना गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांना झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जोशी हे 1995 ते 1999 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि शिवसेनेचे राज्याचे मुख्यमंत्री बनणारे ते पहिले नेते होते.

2002 ते 2004 या काळात केंद्रातील वाजपेयी सरकारमध्ये ते खासदार आणि लोकसभेचे अध्यक्षपदही भूषवले होते. सुरुवातीच्या काळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले होते आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेतून राजकीय कारकीर्द सुरू केली.

त्यांच्या जाण्याने उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केले आहे. एकनाथ शिंदे सोडून गेल्यावर देखील ते त्याच्याबर होते. बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख होती. यामुळे शिवसैनिक दुःख व्यक्त करत आहेत.