बंबीहा गँगने घेतला सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा बदला! लॉरेंस बिश्नोईच्या शार्प शुटरचा वाजला गेम…

हरियाणामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा खास शूटर राजन याची हत्या करण्यात आली आहे. हरियाणात ही घटना घडली आहे. तसेच घटनेनंतर राजनचा मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे.

यमुनानगर गुलाबगढजवळ रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, या हत्येमागे बंबीहा गँगचा हात असल्याचे सांगितले जात आहे. दहशतवादी गँगस्टर अर्श डल्ला याच्या सांगण्यावरून हा कट रचण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे.

राजन हा कुरुक्षेत्र येथील रहिवासी होता. गेल्या अनेक वर्षापासून तो लॅरेन्स बिश्नोई गँगसोबत काम करत होता. पोलीस त्याच्यावर नजर ठेवून होते. या गँगचा तो शार्प शुटर होता. यामुळे त्याच्या मागावर सगळे होते. बंबीहा टोळीच्या गुंडानी आधी राजनवर गोळ्या झाडल्या आणि नंतर जाळून मारले.

दरम्यान, या घटनेनंतर लॉरेन्स बिश्नोईचा शार्प शुटर राजन याच्या हत्येची जबाबदारी बंबीहा टोळीने घेतली आहे. त्यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, गोगामेडी आणि सिद्धू मूसवाला यांच्या हत्येचे प्रत्युत्तर म्हणून आम्ही गेम वाजवला. देवेंद्र बंबीहा नावाच्या एका व्यक्तीच्या पेजवरून ही पोस्ट करण्यात आली आहे.

तसेच पोस्टमध्ये म्हटले आहे की, अनेक वर्षांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन तुम्ही गोगामेडी आणि सिद्धू मूसवाला यांना मारले. तू स्वतःला खूप रागीट समजतोस, आता आम्ही तुला सांगू शत्रुत्व म्हणजे काय, अशी पोस्ट फेसबूकवर करण्यात आली आहे.

दरम्यान, राजनचा मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. यमुनानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलाबगढजवळ रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेचा तपास सध्या पोलीस करत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.