BAN vs SL : श्रीलंका-बांगलादेशची मॅच संपल्यानंतर मोठा राडा! खेळाडू एकमेकांच्या अंगावर गेले, हाणामारीची वेळ अन्…

BAN vs SL : आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या लढतीत मोठा राडा बघायला मिळाला. अँजेलो मॅथ्यूजला टाइम आउट केले तेव्हापासून मॅचमध्ये राडा सुरू झाला. फलंदाजीला आलेल्या मॅथ्यूजने २ मिनिटे कोणताही चेंडू खेळला नाही.

यामुळे मोठा गोंधळ झाला. बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनने टाइम आउट नियमानुसार आउटची अपील केली आणि अंपायरने त्याला बाद केले. यामुळे हा वाद पुढे वाढतच गेला आणि सामना संपल्यानंतर देखील कायम राहिला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या लढतीत वातावरण तणावाचे होते.

टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय बांगलादेशने घेतला होता. लंकेने सर्वबाद २७९ धावा केल्या आणि विजयाचे लक्ष्य बांगलादेशने ४ विकेटच्या बदल्यात पार केले. बांगलादेशने विजय मिळवल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांसोबत हात देखील मिळवले नाही.

दरम्यान, मँथ्यूजला टाइम आउट करता येईल हे शांतोनेच शाकीबला सांगितले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाइम आउट नियमानुसार बाद होणारा मँथ्यूज हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. यामुळे तो नाराज झाला. यामुळे हा वाद वाढला.

या सामन्यात ज्या मँथ्यूजवर अन्याय झाला त्यानेच बांगलादेशच्या डावात शाकीब आणि शांतो यांना बाद केले. मँथ्यूज फलंदाजीला मैदानात आल्यानंतर २ मिनिटात त्याने किंवा दुसऱ्या फलंदाजाने एकही चेंडू खेळला नाही.

दरम्यान, वर्ल्डकपच्या इतिहासात बांगलादेशच्या संघाने प्रथमच श्रीलंकेचा पराभव केला. या पराभवासह श्रीलंका सेमीफायनलच्या शर्यतीतून देखील बाहेर झाली आहे. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.