Beed news : शाळेच्या आवारातच गुरुजींचे अश्लील कृत्य, ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, राज्यात खळबळ…

Beed news : बीडमधून एक धाकादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथील एका शाळेच्या आवारात दोन शिक्षक अश्लील कृत्य करतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत.

यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकांनी ९ डिसेंबर रोजी शिक्षकावर तसेच त्याच्या सोबत असलेल्यांविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेवर शाळा व्यवस्थापनानेही यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. बीड शहर पोलिसांनी पुरुष शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती मंगळवारी बीड शहर पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश चाटे यांनी दिली.

तो पुण्याचा असल्याची माहिती आहे, आम्ही शोध पथके पुण्याला पाठवत आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून काम करणाऱ्या एका पुरुष आणि महिला यांनी परीक्षा विभाग आणि कॅम्पसमधील इतर आवारात अश्लील कृत्य केले.

अनेकदा त्यांना हे कृत्य करत असताना बघितले आहे. या कृत्याचा व्हिडिओही शूट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. यामुळे याची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

याबाबत कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. शाळेतच असले कृत्य केले तर मुलांवर कशा प्रकारे संस्कार होतील, असेही पालकांनी म्हटले आहे. यामुळे कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.