Beed news : बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला भीषण आग लागली. यामुळे मोठी पळापळ झाली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ही बस लातूरहून परभणीकडे जाणारी परळी शहरात आली. यावेळी बसचे टायर फुटले आणि बसला भीषण आग लागली. यावेळी बसमध्ये 6 प्रवासी प्रवास करत होते. यावेळी चालकाच्या प्रसंगावधानाने वेळीच पुढील अनर्थ टळला आहे. यावेळी मोठी गर्दी झाली होती.
घटनेबाबत माहिती अशी की, परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येतात काहीतरी वाजल्याचा आवाज मोठा झाला. मात्र, यावेळेस या शिवशाहीच्या चालकाला आपल्याच गाडीच्या टायरचा हा आवाज आला. यामुळे त्यांना घटनेची माहिती मिळाली.
त्यांनी लगेच गाडी साईडला करत गाडीचा अंदाज घेतला, त्यावेळेस गाडीचा टायर फुटल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर या गाडीच्या टायरने पेट घेतला. त्यांनी लगेच प्रवाशांना बाहेर काढले. यामुळे अनर्थ टळला.
दरम्यान, तात्काळ या ठिकाणी अग्निशामक दलाच्या एक गाडी पोहोचली. आगीने रुद्र अवतार घेतल्याने ही शिवशाही बसला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या लागल्या.
घटनेच्या काही तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याने समाधान व्यक्त केला जात आहे. यामध्ये बसचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.