---Advertisement---

Bharat Ganeshpure : पहा अभिनेते भारत गणेशपुरेंच्या घराची खास झलक…; घर म्हाडाचं पण आतून सजवलंय लई भारी

---Advertisement---

bharat ganeshpure home : प्रत्येकाच एक स्वप्न असत की आपलं एक हक्काचं घर असावं. यासाठी अनेकजण आयुष्यभर कष्ट करत असतात. सध्या कलाकार कोट्यातून आजवर अनेक कलाकारांना म्हाडाची घर मिळवली आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी कमी दरात घरं मिळणं यामुळे शक्य झालं आहे.

यामध्ये मराठी सृष्टीतील भारत गणेशपुरे हे देखील गेली अनेक वर्षे म्हाडाच्याच घरात राहत आहेत. भारत गणेशपुरे यांनी नुकत्याच आपल्या या घराला नवीन लूक दिला आहे. याचे फोटो बघून अनेकांना हे घर खूपच आवडले आहे. आपल्याला हवं तसं इंटेरिअर करून घेतल्याने त्यांच्या घराला एक छान लूक मिळाला आहे.

भारत गणेशपुरे हे गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्रीत काम करत आहेत. चला हवा येऊ द्या या शोमूळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. यामुळे ते प्रत्येकाच्या घराघरात पोहोचले आहेत. त्यांचे काम देखील कौतुकास्पद असते.

https://www.instagram.com/reel/Cx5ieGtoY3F/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, घराचे इंटेरिअर करताना त्यांनी पांढऱ्या रंगाच्या थीमला प्राधान्य दिले आहे. त्यांचे हे छोटंस घर आता प्रशस्त वाटू लागले आहे. त्यांना निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता येत आहे. भेटवस्तू देखील त्यांनी जपून ठेवल्या आहेत. हॉलच्या एका कोपऱ्यात या वस्तुंना ततानी एक राखीव जागा ठेवली आहे.

भरत गणेशपुरे यांच्या मुलाची बेडरूम सुद्धा त्याला हवी तशी त्यांनी सजवून दिली आहे. भरपूर सूर्यप्रकाश आणि खेळती हवा यामुळे या घरात प्रसन्न वाटत आहे. त्यांनी मिळवलेली ही सर्व बक्षिसं घराच्या हॉल मध्ये छान सजवण्यात आली आहेत.

त्यांनी त्यांच्या या घराची सफर एका व्हिडिओतून करून दिली आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. विदर्भातील बरेचसे कलाकार आता मराठी इंडस्ट्रीत स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवू लागले आहेत. त्यांनी मुंबई घर घेतली असून ते याठिकाणीच स्थाईक झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---