भारत-इंग्लंड कसोटीदरम्यान मोठी बातमी! इंग्लंडचा दिग्गज खेळाडू फिक्सिंग प्रकरणात दोषी, 17 वर्षांची बंदी

इंग्लंड क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात संघाला पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. दरम्यान, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंग्लंड क्रिकेटला मोठा धक्का बसला असून आयसीसीने त्यांच्या एका क्रिकेटपटूवर 17 वर्षांची बंदी घातली आहे.

हा क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला आहे. एकूण आठ क्रिकेटपटूंवर आरोप ठेवण्यात आले होते, त्यापैकी एक हा इंग्लंडचा क्रिकेटर होता. आणि त्याच्या चौकशीत आयसीसीने त्याच्यावर तीन वेगवेगळ्या प्रसंगी फिक्सिंगसाठी इतर खेळाडूंना भेटवस्तू दिल्याचा आरोप केला आहे.

लंडन क्लबचा क्रिकेटर रिझवान जावेद अबू धाबी टी10 क्रिकेट लीगदरम्यान मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला. हे प्रकरण 2021 चे सांगण्यात येत आहे. आयसीसीने केलेल्या तपासणीत असे आढळून आले की रिझवानने तीन वेळा मॅच फिक्सिंगसाठी इतर खेळाडूंना भेटवस्तू दिल्या होत्या.

आयसीसीने त्याला भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंग प्रकरणी दोषी ठरवले. यामुळे त्याच्यावर आता 17 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. हे आरोप गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये करण्यात आले होते. रिजवान जावेदसोबतच बांगलादेशचा आंतरराष्ट्रीय खेळाडू नासिर हुसेनही यामध्ये दोषी आढळला होता.

हुसेनवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणी आयसीसीचे महाव्यवस्थापक इंटिग्रिटी ॲलेक्स मार्शल यांनी सांगितले की, रिझवान जावेदने आपल्या कृतीची वारंवार पुनरावृत्ती केल्यामुळे त्याच्यावर इतकी दीर्घ बंदी घालण्यात आली आहे. अशा चुकीच्या गोष्टींना क्रिकेटमध्ये कोणत्याही स्तरावर स्थान मिळणार नाही.

असा स्पष्ट संदेश हे करणाऱ्यांना जावा यासाठी ही बंदीही मंजूर करण्यात आली. सामने फिक्स करण्यासाठी इतर खेळाडूंना गिफ्ट दिल्याचा आरोप. मॅच फिक्सिंगसाठी इतर खेळाडूंना प्रवृत्त केल्याचा आरोप. DACO ला याबद्दल संपूर्ण माहिती न दिल्याचा आरोप. DACO च्या तपासात सहकार्य न केल्याचा आरोपही करण्यात आला.