क्रिकेट विश्वात मोठी घडामोड!! एकाच दिवशी दोन कर्णधारांचे राजीनामे, आता नवीन कर्णधार कोण?

क्रिकेट क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. 1-2 ऑक्टोबरच्या रात्री जागतिक क्रिकेटमध्ये स्फोट झाला. रात्री उशिरा एक नव्हे तर दोन देशांच्या कर्णधारांनी राजीनामा दिला आहे. या कर्णधारांमध्ये पाकिस्तानचा बाबर आझम आणि न्यूझीलंडचा टीम साऊदी यांचा समावेश आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या दोघांनी कर्णधारपद सोडण्याचे कारण खराब कामगिरी असल्याचे मानले जात आहे. न्यूझीलंड संघ या महिन्यात भारतासोबत कसोटी सामना खेळणार आहे. न्यूझीलंडला नुकतेच श्रीलंकेविरुद्ध डावात पराभवाला सामोरे जावे लागले. याच्या एका दिवसानंतर टीम साऊदीने कर्णधारपद सोडले.

सौदीने सांगितले की, ब्लॅककॅप्सचा कर्णधार होणे हा मोठा सन्मान आहे. ही भूमिका मी पूर्ण क्षमतेने साकारली आहे. पण मला वाटते की पद सोडण्याची हीच योग्य वेळ आहे. न्यूझीलंडचा संघ या महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत दौऱ्यावर टॉम लॅथम न्यूझीलंड संघाची धुरा सांभाळणार आहे.

टीम साऊदीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 14 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले. यापैकी न्यूझीलंडने 6 जिंकले आणि तेवढेच सामने गमावले. दोन सामने अनिर्णित राहिले. टीम साऊदीने कर्णधारपद सोडल्याने न्यूझीलंडला फारसा त्रास होणार नाही. याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

याचे कारण किवी क्रिकेट बोर्डाने टॉम लॅथमला अनेकदा कर्णधारपदाची संधी दिली आहे. या यष्टीरक्षक फलंदाजाला कर्णधारपदाचा पुरेसा अनुभव आहे. पण पाकिस्तानला कर्णधार शोधणे सोपे जाणार नाही. पाकिस्तान संघाचे कर्णधार मोहम्मद रिझवान याच्याकडे देणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझम याच्याकडे वनडे आणि टी-२० क्रिकेट फॉरमॅटचे कर्णधारपद सोपवले होते. आझमला दुसऱ्यांदा कर्णधारपद दिले होते. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान बाहेर पडल्यामुळे त्याला कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यामुळे त्याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.