मोठी बातमी! विद्यापीठात मृत्यू तांडव, अंदाधुंद गोळीबारात 15 जणांचा मृत्यू, नेमकं घडलं काय?

गोळीबाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. चेक रिपब्लिकच्या चार्ल्स विद्यापीठात गुरुवारी रात्री गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. या अंदाधुंद गोळीबारात तब्बल 15 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

यामुळे याठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या घटनेत 20 हून अधिक लोकं या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. याबाबत पोलीस तपास करत असून ही एक मोठी घटना आहे. सध्या जखमींवर उपचार सुरु असून 13 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

या घटनेमध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रागमधील चार्ल्स विद्यापीठाच्या आर्ट विभागात मास शूटींगची ही घटना घडली. याबाबत गृहमंत्री म्हणाले, ज्याने गोळीबार केला त्याचा देखील यामध्ये मृत्यू झाला आहे.

घटनास्थळी अन्य कोणी हल्लेखोर नसल्याची पुष्टी करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसराची नाकाबंदी करण्यात आली. स्थानिकांना या भागात न जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अंदाधुंद गोळीबारात तब्बल 15 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, गोळीबाराच्या या घटनेचा दहशतवादाशी संबंध नाही. चेक रिपब्लिकच्या इतिहासातील सर्वात वाईट सामूहिक गोळीबार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे पोलीस देखील सतर्क झाले आहेत. अधिकाऱ्यांना आधीच्या दिवशी माहिती मिळाली होती.

हा व्यक्ती राजधानीच्या बाहेरील क्लाडनो प्रदेशातील त्याच्या शहरातून प्रागला जात होता. त्यानंतर काही वेळातच शूटरचे वडील मृतावस्थेत आढळले. याबाबत पोलीस आता कसून चौकशी करत असून अनेकांना ताब्यात घेतले आहे.