मोठी बातमी! ‘या’ दिवशी लागणार आमदार अपात्रतेचा निकाल, होणार राजकीय भूकंप?

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालावर अनेकदा सुनावणी होत आहे. असे असताना अंतिम निर्णय कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता याबाबत अंतिम निर्णय लवकरच समोर येणार आहे. यामुळे निकाल काय लागणार याकडे राज्यासोबतच देशाचं लक्ष लागलं आहे.

१० जानेवारीला बुधवारी दुपारी ४ नंतर लागणार निकाल लागण्याची शक्यता आहे. याबाबत नुकतीच माहिती समोर आली आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे.

त्यामुळे त्यांच्या बाजूने निकाल आला तर पुन्हा राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता आहे. दरम्यान हा निकाल कोणत्या दिवशी किती वाजता लागणार याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता राजकीय भेटीगाठी सुरू झाल्याची देखील माहिती आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला आहे. बुधवारी दुपारी ४ नंतर लागणार निकाल लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विधीमंडळात निकालातील शाब्दिक त्रूटी दूर करण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार आहेत. सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार असल्याचीही माहिती आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील कायदेतज्त्रांकडे पाठविला असल्याची माहिती आहे.

त्यामुळे येत्या १० जानेवारीला नेमका काय निकाल येणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. हा निकाल येणाऱ्या काळात बऱ्याच गोष्टींसाठी अवलंबून असणार आहे. यामुळे तो कोणाच्या बाजूने लागणार हे लवकरच समजेल.