मोठी बातमी! विनेशला रौप्यपदक मिळणार की नाही? लवादाने स्पष्टपणे सांगितले की…

भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला. एक निराशाजनक बातमी समोर आली. भारताची ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट हिला अपात्र घोषित करण्यात आलं. यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली. विनेश फोगाट ५० किलो वजनी गटात उतरली होती. मात्र तिचं वजन काही ग्रॅम जास्त भरल्यानंत तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. विनेश फोगाटने ऑलिम्पिकमध्ये फायनलला धडक मारली होती.

विनेश फोगाटने सेमीफायनलमध्ये क्युबाच्या युस्नेलिस गुजमान लोपेलचा पराभव केला होता. सुवर्णपदकापासून ती फक्त एक डाव दूर होती. मात्र त्या आधीच ही बातमी समोर आल्याने निराशा झाली. यानंतर तिने निवृत्ती जाहीर केली. ऑलिम्पिक स्पर्धेत अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटने गुरुवारी कुस्तीला अलविदा करण्याचा मोठा निर्णय घेतला.

दरम्यान, ऑलिम्पिक समितीच्या या निर्णयावर विनेशने CAS कडे याचिका केली होती. याबाबत आलेल्या अपडेटनुसार याचिकेवरील निर्णय आज न होता तो पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा संपण्याआधी दिला जाईल, असे सांगण्यात आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विनेशने सलग ३ लढतीत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र फायनल मॅच होण्याआधी तिचे वजन १०० ग्राम अधिक झाल्याने विनेशवर कारवाई करण्यात आली होती. यावर तिने याचिका केली होती. कारवाईनंतर तिने निवृत्ती देखील जाहीर केली होती. तीने आपल्या x अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर करत निवृत्ती जाहीर केली आहे.

तीने आपलं दु:ख व्यक्त करताना म्हटलं आई कुस्ती जिंकली मी हारले. तीने आपल्या फॅन्सची माफी मागीतली आहे.’ मी आता खचले आहे, आता मी कुस्ती करू शकत नाही, कुस्ती जिंकली मी हारले. मला माफ करा, माझं स्वप्न तुटलं, आता कुस्ती खेळण्याची अजून ताकद माझ्यात नाही.

अलविदा कुस्ती, 2001-2024 या काळात तुम्ही मला जो सपोर्ट केला त्याबद्दल मी तुमची सदैव आभारी आहे, अशी भावनिक पोस्ट विनेश फोगटने शेअर केली आहे. यामुळे देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. ऑलिम्पिकमध्ये एका दिवसात तिने तीन कुस्तीपट्टूंना हरवून फायनल गाठली होती.