पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले होते. त्यामुळे पुणे लोकसभा मतदार संघाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे याठिकाणी पोटनिवडणूक होईल असे वाटत होते. पण अजूनही ती झालेली नाही. त्यामुळे आता ती होण्याची शक्यता मावळली आहे.
सध्या भाजपचे लक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणूकांकडे आहे. त्यासाठी त्यांची मोर्चे बांधणी सुरु आहे. लोकसभा मतदार संघानुसार जबाबदारी दिली जात आहे. अशात आमदार महेश लांडगे यांना भाजपने मोठा धक्का दिल्ला आहे.
पुणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदार संघ आहे. त्यामुळे समन्वयक भाजपकडून नेमले गेले होते. पुणे लोकसभा मतदार संघाची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आली होती. बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदारी राहूल कुल यांना देण्यात आली होती.
अशात शरद पवार यांच्या गटातील खासदार असलेले अमोल कोल्हे यांच्या शिरुर लोकसभा मतदार संघाची जबाबादारी महेश लांडगे यांना देण्यात आली होती. पण त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. आता ही जबाबदारी भाजपने राजेश पांडे यांच्याकडे दिली आहे.
भाजपने जबाबदारी काढून घेणे महेश लांडगेंसाठी धक्कादायक असल्याचे म्हटले जात आहे. ही जबाबदारी आता राजेश पांडे यांच्याकडे देण्यात आल्यामुळे आता शिरुर लोकसभा मतदार संघाकडे तेच लक्ष देणार आहे.
दरम्यान, राजेश पांडे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून भाजपमध्ये आले आहे. ते एबीव्हीपीचे प्रदेशाध्य म्हणून आधी काम पाहत होते. आता ते भाजपचे उपाध्यक्ष आहे. भाजपने राजेश पांडे यांच्यावर आणखी एक जबाबदारी दिली आहे. मेरी माटी, मेरा देश या देशव्यापी अभियानाची जबाबदारीही ते सांभाळत आहे.