राज्यातील भाजप खासदाराची पत्नी मशाल हाती घेणार? ठाकरे गटाने टाकला मोठा डाव…

राज्यात सध्या जळगाव लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुरू आहे. याठिकाणी महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार जाहीर झाला नाही. यामुळे आता भाजपला टक्कर देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. याठिकाणी भाजपच्याच उमेदवाराकडे गळ टाकला जाणार आहे.

भाजपला तगडे आव्हान देण्यासाठी भाजपचे नाराज असलेले विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती आहे. भाजपचे उन्मेष पाटील यांचा पत्ता कट केल्याने ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

जळगाव लोकसभेत उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही होते. मात्र शेवटी स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे उन्मेष पाटील भाजपवर नाराज झाले. यामुळे ते आता ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजपाच्या जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक जळगाव येथे घेण्यात आली. या बैठकीमध्ये देखील उन्मेश पाटील हे गैरहजर होते. यामुळे याबाबत अजूनच चर्चा वाढली आहे.

याबाबत ते म्हणाले, मला बैठकीबाबत कुठलाही फोन किंवा एसएमएस आलेला नाही. त्यामुळे मी बैठकीला येऊ शकलो नाही. तिकीट डावलल्याने एकदाही उन्मेश पाटील हे जळगाव शहरात भाजपच्या कार्यकर्ता किंवा पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी साठी आलेले नाही. यामुळे ते नाराज झाले आहेत.

दरम्यान, उमेश पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची गोपनीय भेट घेतली असल्याचेही माहिती आहे. मातोश्री दरबारात महाराष्ट्रातील काही उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली. यात विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांचेही नाव त्या ठिकाणी चर्चेत घेण्यात आले.

जळगाव लोकसभेत महाविकास आघाडीकडून भाजपला तगडे आव्हान देण्यासाठी प्रबल्य उमेदवाराची गरज महाविकास आघाडीला होती. यामुळे हेच नाव येणाऱ्या काळात फायनल होईल, असेही सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.