भाजपचं ठरलं! शिंदेंचा राजीनामा, मुलाला केंद्रात मंत्रिपद अन् अजित पवार मुख्यमंत्री? वाचा पडद्यामागे काय घडतय..

अजित पवरांनी शिवसेना भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. पण आणखी काही राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा आहे. भाजप आता पुन्हा नवी खेळी खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचे हे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे. भाजपमध्येही ते मुख्यमंत्रिपदासाठीच आल्याची चर्चा आहे. पण सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. त्यामुळे अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर एकनाथ शिंदे यांना राजीनामा द्यावा लागणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला तर त्यांना मोठी जबाबदारी द्यावी लागणार आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाऊ शकते असेही म्हटले जात आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीला जात होते. त्यांच्यासोबतच श्रीकांत शिंदेही काहीवेळा दिल्लीला जाताना दिसून आले. पण तेव्हा याबाबत काही चर्चा नव्हती. पण आता त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल अशी चर्चा रंगली आहे.

सध्या भाजप राज्यात मराठा असलेलं सक्षम नेतृत्व शोधत आहे. एकनाथ शिंदे यांना संधी दिली गेली आहे, पण ते भाजपच्या अपेक्षांना पुर्ण करु शकलेले नाहीत, अशी चर्चा आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांनाही अनेक ठिकाणी अपयश आले आहे. २०१९ मध्ये सत्ता आणणं, पहाटेचा शपथविधी यासाठी भाजपने त्यांना पुर्णपणे पाठिंबा दिला होता. पण त्यावर फडणवीस खरे उतरले नाही.

सध्या मोदी-शहा देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनाही अपयश आले. विधानपरिषद, पोटनिवडणूका यामध्ये एकनाथ शिंदे यांचा प्रभाव दिसून आलेला नाही. त्यामुळे राज्यात मराठा चेहरा असलेले सक्षम नेतृत्व भाजप सध्या शोधत आहे.

भाजपसाठी तो चेहरा अजित पवार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना चांगलं खातं, श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद तर फडणवीसांनाही केंद्रात जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनानंतर या सर्व राजकीय घडामोडी होती अशीही चर्चा आहे.