शाहू छत्रपतींविरोधात भाजपचा मोठा डाव! राजघराण्यातील ‘या’ उमेदवाराला देणार तिकीट

सध्या लोकसभेचेउमेदवार अंतिम केले जात असताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देत महाविकास आघाडीने महायुतीसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. यामुळे आता याठिकाणी भाजपा नेमकं काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

असे असताना आता महविकास आघाडीने छत्रपती घराण्यात उमेदवारी दिल्याने महायुतीने देखील नवीन खेळी खेळली आहे. शाहू महाराजांविरोधात भाजप नेते समरजीत घाटगेंना उमेदवारी दिली जाणार आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

कोल्हापूरची जागा शिवसेनेला गेली तरीही समरजीत सिंह घाटगे यांना शिवसेनेतून उमेदवारी दिली जाऊ शकते आणि त्यासाठी घाटगे तयार होतील, अशी शक्यता आहे. यामुळे यावर दिल्लीत खलबत सुरू झाली आहेत. याबाबत भाजप नेते देखील अनुकूल आहेत.

दरम्यान, कोल्हापूरच्या जागेबाबत वरिष्ठ पातळीवर अनेकांनी समरजित घाटगे यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जागावाटपात ही सीट कोणाला जाणार यावर समरजीत घाटगे कोणत्या चिन्हावरून निवडणूक लढवणार हे पुढं येईल.

राज्यात सध्या जागावाटप अद्याप निश्चित झाले नसले तरी भाजप जास्तीत जास्त जागा लढवण्यावर ठाम आहे. यामुळे मित्रपक्षातून नाराजी आहे. दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू आहेत. या बैठकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबाबत देखील चर्चा झाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील छत्रपती घराण्यातून शाहू महाराजांना उमेदवारी देत मास्टरस्ट्रोक मारला आहे. त्यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले आहे. यामुळे भाजपपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.