कंगनाच्या कानाखाली वाजवणाऱ्या जवान कुलविंदर कौरला ‘हा’ बाॅलीवूड कलाकार देणार नोकरी

चार दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रकार समोर आला. अभिनेत्री कंगना राणावत हिच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली. कंगना राणावत नुकतीत लोकसभा निवडणुकीत जिंकून आली आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघात तिचा विजय झाला आहे. मात्र कंगना दिल्लीसाठी रवाना होत असताना तिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कंगना राणावत दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर दाखल झाली असता तिथे एका सीआयएसएफ च्या महिला कर्मचाऱ्याने तिला कानशिलात लगावली. यामुळे याची बातमी वाऱ्यासारखी देशात पसरली. घटनेनंतर कंगना भडकली याबाबत तिने महिला कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली.

नंतर या महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. कुलविंदर कौर असे या महिला जवानाचे नाव असून ती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. गेल्या दोन वर्षापासून ती चंदीगड विमानतळावरती कार्यरत आहे. आता या प्रकरणाची चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे. अशातच आता एका सेलिब्रिटींनी या प्रकरणाबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

या पोस्टकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कंगना रणौतसोबत घडलेल्या चंदीगड विमानतळावरील घटनेबाबत विशालने पोस्ट केली. मी कधीही हिंसेचे समर्थन करत नाही, परंतू सीआयएसएफ जवानाच्या रागाची गरज मला पूर्णपणे समजली. सीआयएसएफ जवानावर कोणतीही कारवाई केल्यास, त्यांना नोकरी संधी मिळेल, याची मी खात्री करेन, जर त्यांनी ती स्वीकारली तर. जय हिंद. जय जवान. जय किसान. विशालच्या या पोस्टची सध्या चर्चा होत आहे.

अशी पोस्ट त्याने केली आहे. दरम्यान, कंगना विमानतळाच्या बोर्डिंग पॉईंटवर गेल्यावर तेथे उपस्थित असलेल्या सीआयएसएफ अधिकारी कुलविंदर कौरनं तिच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या घटनेनंतर कुलविंदर कौर यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कंगनाने शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या विधानामुळे महिला सीआयएसएफ जवानाने तिच्या कानशि‍लात लगावली, असे सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता यावरून राजकीय वातावरण तापले आहे.