Poonam Pandey: पूनम पांडेच्या मृत्यूचं गूढ? दोन दिवसांपूर्वी पार्टी, मृत्यू झाला तर नातेवाइक कुठे? प्रश्नांवर सर्वांचंच मौन

Poonam Pandey: बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाली. अवघ्या 32 वर्षांच्या पूनमच्या अचानक झालेल्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. पण तिच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, ज्यामुळे सस्पेन्स वाढत आहे.

पूनम पांडेच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या मॅनेजरने एक पोस्ट शेअर केली. यात म्हटलंय की, पूनमचा सर्वायकल कॅन्सरमुळे मृत्यू झाला आहे. तिने कानपूरमध्ये तिच्या होमटाऊनमध्ये अंतिम श्वास घेतली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पूनमच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांकडून किंवा पती सॅमकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

याच दरम्यान पूनम पांडेची मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात ती म्हणते, “तुमच्या समोर इतकी मोठी बातमी येणार आहे की तुम्हाला सर्वांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे. लोकांना सरप्राईज द्यायला मला आवडतं. जेव्हा लोकांना वाटतं की मी सुधारतेय, त्यावेळी सरप्राईज द्यायला आणखी आवडतं, मी तुमच्या सर्वांची रिअॅक्शन पाहण्यासाठी उत्सुक आहे.”

या मुलाखतीमुळे आणि पूनमच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांकडून शांतता असल्यामुळे अनेकांना तिच्या मृत्यूबद्दल संशय निर्माण झाला आहे. याशिवाय पूनम पांडेने तीन दिवसांपूर्वी गोव्यातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओत ती गोव्यात पार्टी करताना दिसतेय.

प्रसिद्ध फॅशन डिझाईनर रोहित शर्मा यांनीही पूनम पांडेच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, पूनम दोन दिवसांपूर्वी मुंबईत शुटिंग करत होती. त्यामुळे तिच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवणं कठिण आहे. पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी मनोरंजन क्षेत्रासाठी धक्कादायक आहे.

पूनम पांडेच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तिच्या कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया नसल्यामुळे आणि मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच्या मुलाखतीमुळे सस्पेन्स वाढत आहे. पूनम पांडेचा खरंच मृत्यू झालं का? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी कुटुंबियांकडून कोणी प्रतिक्रिया मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.