बाॅलीवूड पुन्हा हादरले! प्रसिद्ध अभिनेत्रीचं अचानक निधन, मृत्यूमागील धक्कादायक कारण आले समोर

Kavita Chaudhary : सध्या मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. उडान मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री कविता चौधरीचं निधन झाले आहे. यामुळे चाहत्यांना एकच धक्का बसला आहे. उडान मालिकेमध्ये त्यांनी आयपीएस महिला अधिकाऱ्याची भूमिका पार पाडली होती.

यामधील कल्याणी सिंहच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. त्यांचे निधन हदयविकाराच्या धक्क्याने झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये तिचे सहकारी असलेल्या अनंग देसाई यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान, रात्रीच कविता यांचे निधन झाले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून कविता ही एका रुग्णालयात दाखल होती. काल रात्री साडेआठच्या सुमारास तिचं निधन झालं. तिच्या जाण्यानं टीव्ही मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे.

याबाबत त्यांच्या भाच्याने माहिती दिली आहे. या घटनेमुळे मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला आहे. अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. उडान या मालिकेतून कविताने तिची वेगळी ओळख चाहत्यांमध्ये निर्माण केली होती.

दरम्यान, सोशल मीडियावर तिचा चाहतावर्ग मोठा आहे. गेल्या काही दिवसांपासून कविता ही आजारानं त्रस्त असल्याचे दिसून आले होते. यामुळे त्यांना सतत रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. अखेर त्यांचे निधन झाले आहे.

दरम्यान, त्यांच्या जाण्याने त्यांच्या निकटवर्तीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेकजण उपस्थित होते. यावेळी सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले होते.