रोज शेजाऱ्यांचा कचरा चोरून खायचा चिमुकला, पकडल्यावर समोर आली भयंकर माहिती, घटनेने सगळेच हादरले…

फ्रान्समध्ये 7 वर्षांचा चिमुरडा तब्बल 2 वर्षं घरात एकटाच राहत होता. कोरोना काळात त्याची आई त्याला सोडून गेली होती. पतीला घटस्फोट दिल्यानंतर मुलाची आई दुसऱ्या महिलेसोबत राहण्यास गेली होती. तिने मुलाला घऱातच सोडून दिले होते.

या घटनेने सगळे हादरले आहेत. मुलाला सोडून गेल्याचा आरोपाखाली महिला कोर्टात हजर झाली असता ही घटना उघडकीस आली. मुलगा 2020 पासून फ्लॅटमध्ये कशा पद्धतीने एकटाच राहत होता याबाबत माहिती समोर आली.

शेजाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर हे उघड झालं होतं. खटल्यात जेव्हा फिर्यादी वकिलांनी घटनाक्रम उलगडला तेव्हा अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. थंडीत गरम पाणी, वीज नसताना मुलगा कित्येक महिने घरात राहिला.

हा मुलगा शाळेत जाणारी बस पकडत होता. यामुळे त्याच्या शिक्षकांनाही मुलगा कोणत्या स्थितीतून जात होता याची माहिती मिळाली नाही. शेजाऱ्याने सांगितलं की, मुलगा समोरच्या अपार्टमेंटमध्ये राहत होता. पण तो फार सामान्य वागत असल्याने कल्पनाच आली नाही.

तसेच एकीने सांगितले की, मी माझ्या घराच्या बाल्कनीत झाडं लावली आहे. तिथे मी त्याला टोमॅटो खाताना पाहिल्यानंतर लक्षात आलं. तो दुसऱ्या एका लहान मुलाला सोबत घेऊन येत असे. यामुळे लवकर याबाबत शंका आली नाही.

नंतर मला काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले आणि मी प्रशासनाला याबाबत माहिती दिली. तो शाळेत जाण्यासाठी बसही स्वत:च पकडत होता. आई घरात नसताना तो एकटाच राहत होता. शेजारील अनेकांना याबाबत संशय आला पण त्यांनी जास्त लक्ष दिले नाही.

एका शेजाऱ्याने मुलाची आई नीट बोलत नसे अशी माहिती दिली आहे. यामुळे या महिलेवर कारवाई देखील करण्यात आली आहे. या घटनेमुळे सगळेच हादरले आहेत. याबाबत पोलीस अधिकचा तपास करत आहेत.