नाशिक हादरलं! भरदिवसा २२ वर्षीय तरुणाची हत्या, ६-७ तरुण बाजारापेठेत आले अन्…

गुन्हेगारीच्या अनेक धक्कादायक घटना गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये घडत आहे. मागच्या आठवड्यात एकाच पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये चार हत्या झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे.

अंबड पोलिस स्टेशनच्या हद्दीमधील जुने सिडको परिसरामध्ये एका २२ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. संदीप आठवले असे त्या तरुणाचे नाव होते. या घटनेमुळे संपुर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सध्या संदीपचा मृतदेह जिल्हा रुग्णालयामध्ये आहे. त्याठिकाणी संदीपच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. जोपर्यंत संदीपला न्याय मिळत नाही, हत्या करणारे तुरुंगात जात नाही, तोपर्यंत आपण संदीपचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

६ ते ७ लोकांनी संदीपवर हल्ला केला होता. धक्कादायक गोष्ट म्हणजे ही घटना भरदिवसा झाली होती. त्यांनी त्याच्यावर हल्ला करत त्याची हत्या केली. त्यानंतर ते तिथून निघून गेले. या घटनेमुळे संपुर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

पावणे पाचच्या सुमारात हल्लेखोर संदीपजवळ आले होते. त्यावेळी त्यांनी त्याच्या पोटावर आणि मानेवर हल्ला केला. यामध्ये तो इतका गंभीर जखमी झाला होता की त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यावेळी कोणी नागरिकही त्याच्या मदतीला धावून आले नव्हते.

हल्ल्यानंतर हल्लेखोर तिथून निघून गेले. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. अंबड पोलिस ठाण्यातील पथक लगेचच घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोस्टमॉर्टमसाठी संदीपच्या मृतदेहाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या हल्ल्यामागील कारण अद्यापही समजू शकलेले नाही.