पुण्यात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे पार पडले. यावेळी अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यातून अजित पवारांनी तुफान बॅटिंग केली. लोकसभा निवडणुका आपण एकत्र लढलो, आता विधानसभा निवडणुकाही एकत्रच लढणार आहोत.
असे अजित पवार यांनी सांगितले. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढायच्या आहेत, अशी घोषणाच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यामुळे आता याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
यामुळे महायुती ही केवळ विधानसभेपुरतीच असल्याचे स्पष्ट झाले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राजकीय पक्ष स्वतंत्र मैदानात उतरणार असल्याचं दिसून येतं. यामुळे विधानसभा झाली ली नंतर पक्ष वेगळे होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे आगामी काळात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
अजित पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि ग्रामीण असे मेळावे घ्यायचे होते, पण ग्रामीण मेळावा होऊ शकला नाही, असे म्हणत अजित पवारांनी पिंपरीच्या मेळाव्यातील भाषणाला सुरुवात केली. आज गुरुपौर्णिमा आहे, मी सर्व गुरूंना वंदन करतो.
काही अफवा पसरवल्या जातात, पुण्यात दीपक मानकर आणि पिंपरीमधील कार्यकर्ते सोबत आहेत. विकासासाठी आपण निर्णय घेतला, विरोध पक्षात राहून आंदोलन करुन विकास होत नाही, प्रश्न सुटत नाही. काहीजण गेले, त्यांना स्वातंत्र आहे. आपल्याला पुणे शहरात जोमाने काम करावं लागणार आहे, असेही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी राज्यात दौरे सुरू केले आहेत. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना मोठा धक्का बसला होता. यामुळे आता या निवडणुकीत देखील असच काही घडलं तर मात्र मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता अजित पवार गटासमोर आहेत.