ब्रेकिंग! मनोरंजन विश्वातील विनोदवीर काळाच्या पडद्याआड, प्रख्यात अभिनेते विजय कदम यांचे निधन…

मराठी सिनेमा मालिका आणि रंगभूमी गाजवणारे अभिनेते विजय कदम यांचे निधन झाले आहे. यामुळे मराठी सिनेसृष्टीतून दुःख व्यक्त केले जात आहे. गेले काही दिवस ते कॅन्सरवर उपचार घेत होते. मात्र आज त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. विजय कदम यांच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

विजय कदम यांच्यावर चार किमोथेरपी आणि दोन सर्जरी झाल्या होत्या. त्यांनी मोठा संघर्ष केला. विजय कदम यांच्या पश्चात त्यांची पत्नी व मुलगा गंधार आहे. त्यांनी त्यांच्या आजारपणात त्यांच्या पत्नी व मुलाने त्यांना खंबीर साथ दिली, काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. यामुळे त्यांच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, त्यांनी 1980 आणि 90 काळात एकापेक्षा एक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत त्यांनी चाहत्यांचे मनोरंजन केले. त्यांचा अभिनय आणि विनोदी भूमिका अनेकांच्या मनात घर करून होत्या. पण त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

हा हरहुन्नरी कलाकार गमावल्याने सिनेविश्व आणि चाहत्यांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यामुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आज दुपारी 2 वाजता विजय कदम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या निधनावर मराठी कलाकारांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अंधेरी येथील स्मशानभूमीत विजय कदम यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. विजय कदम यांनी अंधेरी येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. विजय कदम गेल्या दीड वर्षापासून कर्करोगाशी लढा देत होते. अनेकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत होतं.

पण आज त्यांची ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्यावर उपचार सुरु होते. विजय कदम यांचा पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. विजय कदम यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी अनेक भूमिका गाजवल्या होत्या.