ब्रेकिंग! दंगल फेम अभिनेत्रीचे अवघ्या १९ व्या वर्षी निधन, मृत्यूमागील भयंकर कारण आलं समोर…

बॉलीवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला आहे. ‘दंगल’ चित्रपटात आमिर खानची धाकटी मुलगी बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिचे निधन झाले आहे. ती १९ वर्षाची होती. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

तिच्या अशा निधनाने तिच्या आई- वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही काळापूर्वी सुहानीचा अपघात झाला होता, त्यामुळे तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. मात्र सुहानीने घेतलेल्या औषधांचे दुष्परिणाम झाले. यामुळे तिच्या शरीरात हळूहळू पाणी साचले.

यामुळे हळूहळू तिची तब्येत ढासळत गेली. तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात बराच काळ दाखल करण्यात आले होते. मात्र तिच्या औषधोपचारांचा काहीही उपयोग झाला नाही. यामुळे तिने जगाचा निरोप घेतला आहे. तिच्या जाण्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले.

उपचारादरम्यानच रात्री तिचं निधन झालं. शनिवारी फरीदाबाद येथे तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, तिच्या दंगल मधील कामामुळे सर्वांनी तिचे कौतुक केले होते. तिच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला असून बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, सुहानीने दंगल सिनेमात आमिर खानची मुलगी असलेल्या छोट्या बबिताची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. तिने अनेक टीव्ही जाहिरातींमध्येही काम केले होते. यामुळे ती सर्वांना परिचित होती.

दरम्यान, दंगलनंतर तिने अभ्यासासाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती पुन्हा अभिनयाकडे परतणार होती. मात्र तिचा अपघात झाला आहे. यामुळे तिचे स्वप्न अधुरे राहिले आहे. तिच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.