ब्रेकिंग! खासदार निलेश लंके यांच्या पीएवर जीवघेणा हल्ला, राज्यात खळबळ, हल्ला कोणी केला?

अहमदनगरमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेवार निलेश लंके हे जायंट किलर ठरले. यामुळे भाजपला आणि विखे समर्थकांना मोठा धक्का बसला. यामुळे निलेश लंके पुन्हा एकदा हिरो ठरले आहेत.

आता निकालानंतर दोन दिवसांनी अहमदनगरमध्ये मोठा राडा झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्या पीएवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात निलेश लंके यांचे पीए राहुल झावरे गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या जवळच्या माणसावर सुजय विखे पाटील समर्थकांकडून प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती आहे. यामुळे खळबळ उडाली. राहुल झावरे यांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी जिल्ह्यात पसरली आहे.

खासदार निलेश लंके यांचे पीए राहुल झावरे यांच्यावर पारनेर येथे जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. यामध्ये ते थोडक्यात बचावले आहेत. हा हल्ला कोणी केला याबाबत आता शोध घेतला जात आहे.

या हल्ल्यानंतर राहुल झावरे यांच्यावर पारनेरच्या सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सूरू आहेत. त्यांना नगर येथे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत आता निलेश लंके समर्थक आक्रमक झाले आहेत.

आज सकाळी विखे समर्थक असलेले पारनेर येथील विजय सदाशिव ओटी यांच्या एका समर्थकाला सोशल मिडीयावर निलेश लंके यांच्या विरोधात पोस्ट टाकली म्हणून लंके समर्थक राहुल झावरे व कार्यकर्त्यांनी पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे मारहाण केली होती.

या मारहाणीनंतर राहुल झावरे व कार्यकत्ते पारनेर येथे आले असता विखे समर्थक असेलेले विजय ओटी यांनी राहुल झावरे व कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या मारहाणीत राहुल झावरे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत आता पोलीस तपास करत आहेत.