ब्रेकिंग! शिंदे गटात उद्रेक, मंत्र्याचा ठाकरेंना फोन, तुमची जाहीर माफी मागून ८ आमदारांना परत आणतो….

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. अनेक पक्ष फुटल्याने नेमकं कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेत्यांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीत मतदानाला आता काही दिवसांचा कालावधी राहिला आहे. यामुळे प्रचाराला जोर वाढला आहे. राज्यात अनेक बड्या नेत्यांचा सभा होत आहे. अशातच युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जात असताना शिंदे गटातील एका मोठ्या मंत्र्याचा फोन आला होता असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांना केलं आहे. माझ्यासोबत ८ आमदार असून, आम्ही मोठं बंड करत आहोत. असं त्यांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागून परत येतो, असं एका मंत्र्यानं सांगितल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे.

या काळात राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच आदित्य ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेना शिंदे गटातील एक मंत्री आणि ८ आमदार परत शिवसेना ठाकरे गटात येण्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जात असताना शिंदे गटातील एका मोठ्या मंत्र्याचा फोन आला होता. माझ्यासह ८ आमदार असून आम्ही मोठं बंड करत आहोत. उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागून परत येतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

तसेच आम्ही तुम्हाला माफ करु शकत नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितल्याचंही आदित्य ठाकरेंनी सांगितल. तसेच २०१९ नंतर भाजपने ५ प्रमुख चेहरे आयात केले असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. सध्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.