ब्रेकिंग! भाजप आमदाराचा राजीनामा, विधानसभा अध्यक्षांची भेट, राजकीय घडामोडींना वेग..

गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन हरिभाऊ बागडे यांनी राजीनामा दिला.

यामुळे आता भाजप विधानसभा सदस्यांची संख्या एकाने कमी झाली आहे. हरिभाऊ बागडे यांनाही मोठी संधी पक्षाने दिली आहे. यामुळे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते आता राजस्थानचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीत खासदार बनलेल्या ८ आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर, लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशात अनेक राज्यपालांची नियुक्ती केली.
यामध्ये हरिभाऊ बागडे यांना देखील संधी मिळाली आहे.

दरम्यान, त्यातील काही नेते महाराष्ट्रातील आहेत. त्यापैकी एक म्हणजे हरिभाऊ किसनराव बागडे. हरिभाऊ यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्यावर आता मोठी जबाबदारी दिली गेली आहे. भाजपने थेट राज्यपालपदाची जबाबदारी आता त्यांच्यावर देण्यात आली आहे.

हरिभाऊ बागडे यांच्या राजीनामामुळे आता, फुलंब्री मतदारसंघातून भाजपच्या इच्छुक उमेदवारांची जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहेत. यासाठी पक्षश्रेष्ठींकडे नेते फिरत आहेत.

यामध्ये भाजपकडून अनुराध चव्हण, राधाकिसन पठाडे, सुहास सिरसाट, विजय औताडे, रामभाऊ शेळके, राजेंद्र साबळे, प्रदीप पाटील आणि दामुअण्णा नवपुते ही नावे इच्छुक आहेत. आता कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.