नुकतेच महाराष्ट्रात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय महसूल सेवेचे अतिरिक्त आयुक्त समीर वानखेडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत आता ते कोणत्या पक्षाकडून उभे राहणार हे देखील समोर आले आहे. ते महायुतीकडूनही निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे हे शिवसेनेच्या शिंदे गटात जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
मुंबईतील विधानसभेच्या जागेवरून समीर वानखेडे निवडणूक लढवणार आहेत. समीर वानखेडे आयआरएस अधिकारी आहेत. समीर वानखेडे अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे मुंबई विभागाचे माजी संचालक आहेत. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात समीर वानखेडे यांनी कारवाई केली होती.
तेव्हा वानखेडेंनी आर्यन खानला अटक केल्यावर त्याची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले होते. यानंतर अनेक आरोपही करण्यात आले होते. यामुळे त्यांची बदली देखील झाली होती. यामुळे तेव्हा हे प्रकरण चांगलंच गाजल होतं.
दरम्यान, समीर वानखेडे हे मराठीतील अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. समीर वानखेडे यांनी मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्याशी दुसरा विवाह केला. त्यांना दोन मुली आहेत. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण मोठ्या प्रमाणावर बाहेर आली.
या सर्व कारवायांमागे समीर वानखेडे नेतृत्व होतं. त्यांनी रिया चक्रवर्ती आणि सुशांतच्या अनेक मित्रांची चौकशी केली आहे. अनेक दिवस ते या प्रकरणांमुळे चर्चेत होते. दरम्यान, आता ते निवडणूकीच्या रिंगणात टिकणार का हे लवकरच समजेल.