बिग ब्रेकींग! मनोज जरांगे यांच्या सगळ्या मागण्या सरकार मान्य करणार? मोठी माहिती आली समोर

सध्या राज्यात मराठा आरक्षण हा मुद्दा पेटला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी गेल्या चार-पाच महिन्यांपासून आंदोलन सुरु केले आहे. ते आता मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

असे असताना त्यांनी आता मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे सुरु झालेले आंदोलन संपण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. कारण मराठा समाजातील कुणबी नोंदी असणाऱ्या सर्वांना आणि त्यांच्या संगेसोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

राज्य सरकारकडून ही मागणी मान्य करण्यात आल्याची माहिती देखील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यामुळे आता अधिकृत घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेऊन त्यांना ड्रॉफ्ट दाखवणार असल्याची माहिती मिळत आहे.

त्यानंतर अधिसूचना निघणार आहे. मनोज जरांगे यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत मात्र कुणबी नोंदीसाठी सगेसोयरे हा शब्द टाकण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. यावर राज्य सरकार निर्णय घेणार आहे.

यासाठी ते मुंबईत उपोषण देखील करणार आहेत. लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यापूर्वीच तोडगा काढण्यासाठी हालचाली राज्य सरकारकडून सुरू करण्यात आल्या आहेत.

आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. दरम्यान, राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना ड्रॉफ्ट दाखवणार आहे. त्यामुळे आंदोलनाबाबत आज अंतिम तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जरांगे यांनी सुचवलेल्या दुरुस्त्यांसह अधिसूचना काढण्यात येणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन संपणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.