‘अशी करतात फायरिंग…’ भाऊ बहिणीला बंदूक दाखवून घाबरवत होता, अचानक गोळी सुटली अन्..

हरियाणातील सोनीपतमध्ये चुलत बहिणीची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. प्रकरण रोहणा गावचे आहे. आरोपी तरुण विशाल उर्फ ​​गुल्लू हा खांडा गावचा रहिवासी आहे. त्याने आपल्या मित्राकडून पिस्तूल उधार घेतल्याचे सांगितले.

तो त्याच्या चुलत बहिणीला बंदूक दाखवून घाबरवत होता. त्यांच्यात हशा-मस्करी सुरू होती. त्यानंतर अचानक ट्रिगर दाबला गेला आणि त्यातून सुटलेली गोळी चुलत बहिणीच्या छातीत जाऊन लागली. यामुळे त्याची बहीण गंभीर जखमी झाली.

जे झाले ते चुकून झाले. त्याने आपल्या बहिणीची जाणीवपूर्वक हत्या केली नाही. सध्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. रिमांड घेऊन चौकशीही केली जाणार आहे.

त्याचबरोबर पोलिसांनी मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. खारखोडा पोलिस ठाण्याचे प्रभारी सुनील कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहणा गावातील रहिवासी मनोजने पोलिसांना सांगितले होते की,

तो रविवारी हसनगढ येथे काही कामानिमित्त गेला होता. त्याला पत्नी संतोषचा फोन आला. पुतण्या विशालने त्याची १९ वर्षांची मुलगी खुशबूवर गोळ्या झाडल्याचं समोर आलं आहे. हे समजताच त्यांनी तात्काळ खुशबूला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान खुशबूचा मृत्यू झाला.

कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विशालविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर विशालचा शोध घेण्यात आला. मंगळवारी विशालला पोलिसांनी पकडले. आपण हे जाणूनबुजून केले नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.

गोळीबार कसा करायचा ते सांगत होता. त्यानंतर गंमतीत गोळी झाडण्यात आली. गोळी खुशबूच्या छातीतून गेली होती. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. हे सर्व पाहून तो घाबरला. त्यामुळे तो तेथून पळून गेला.