बैलगाडाप्रेमी हळहळले! राज्यासह देशात प्रसिद्ध असेलला हिंदकेसरी मन्या बैलाचा मृत्यू…

राज्यातील बैलगाडा प्रेमींबाबत एक दुःखाची बातमी आली आहे. आठवडाभरातच दुसऱ्यांदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बैलगाडा शर्यत घाटांवर आधिराज्य गाजवणारा हिंदकेसरी मन्या बैलाचं निधन झाले आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. यामुळे बैलगाडा मालकांमध्ये आणि बैलगाडा प्रेमींमध्ये शौककळा पसरली आहे.

हा बैल राज्यात प्रसिद्ध होता. अनेक मोठ्या स्पर्धा त्याने जिंकून दिल्या होत्या. काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे माजी अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांचं निधन झाले. त्यानंतर आज पुन्हा एकदा बैलगाडाप्रेमींच्या कानावर दु:खद बातमी आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

बैलगाडा शर्यत घाटांवर आधिराज्य गाजवणारा हिंदकेसरी मन्या बैलाचे निधन झाले आहे. मन्याच्या निधनानंतर बैलगाडा मालकांमध्ये आणि बैलगाडा प्रेमींमध्ये शौककळा पसरली आहे. सध्या सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल होत आहेत.

या घटनेने बैलगाडा मालक राजू जवळेकर यांनाही अश्रू अनावर झाले. पोटच्या लेकराप्रमाणे जपलेला मन्याने मालकाला वेगळी ओळख निर्माण दिली होती. मन्या प्रत्येक घाटाचा मानकरी ठरला होता. मन्याच्या अंत्यविधीला मोठी गर्दी उसळली होती. अनेक बैलगाडा मालक याठिकाणी आले होते.

मन्या बैलाच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खेड तालुक्यातील ढाण्या वाघ हरपला. बैलगाडा क्षेत्रातील सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा, बैलगाडा क्षेत्रातील अपराजित योद्धा हिंदकेसरी मन्या तूझ्यासाठी अख्खा महाराष्ट्र रडत आहे.

मन्या तू परत येना, अशा प्रतिक्रिया अनेकांनी सोशल मीडियावर दिल्या आहेत. यामुळे त्याची लोकप्रियता किती होती याबाबत अंदाज आपल्याला येईल. अनेकांनी त्याच्या अंत्यदर्शनासाठी हजेरी लावली होती. यावेळी सगळे भावनिक झाल्याचे दिसून आले.