गणपतीच्या मिरवणुकीतून घरी आला, जेवण केलं अन् विपरीत घडलं, मेंदूतून रक्तस्राव सुरू झाला अन्…

कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी अभिजित महादेव सावंत  गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत आनंदाने सहभागी झाला. मित्राबरोबर त्याने आइस्क्रीम खाल्ले. साडेदहाच्या सुमारास त्याच्या डोक्यात अचानक कळा सुरू झाल्या.

दवाखान्यात नेल्यानंतर मेंदूतील रक्तस्रावाचे निदान झाले. असे असताना कोल्हापुरात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अभिजित हा गल्लीतील मंडळाच्या गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला.

असे असताना अवघ्या 12 तासातच होत्याच नव्हतं झालं आहे. या मंडळाची साउंड सिस्टीम नव्हती. मात्र इतर मिरवणुकीतील साउंड सिस्टीम वाजत होते. मोठ्या उत्साहाने सर्व कार्यकर्ते, मित्रांसमवेत त्याने गणरायाला निरोप दिला. मात्र त्याच्यासोबत ही धक्कादायक घटना घडली आहे.

दरम्यान, मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन करून अभिजित घरी आला. जेवण केल्यावर एका मित्राने फोन करून बाहेर बोलावून घेतले. दोघांनी आइस्क्रीम खाल्ले. इथपर्यंत सगळं काही व्यवस्थित होते. मात्र नंतर त्याला त्रास होऊ लागला.

साडेदहाच्या सुमारास त्याच्या डोक्यात अचानक कळा सुरू झाल्या. त्यामुळे मित्राने त्याला दवाखान्यात नेले. नंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू केले गेले. स्कॅनिंग केले असता मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याला तत्काळ उपचारासाठी कोल्हापूरला नेले.

असे असताना सकाळी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अभिजितच्या मागे आई, वडील व बहीण असा परिवार आहे. त्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचे दुकान असल्याने त्याचे सगळ्यांशी चांगले सबंध होते.