Bihar : ५००० मुलींमध्ये बसून परीक्षा देतोय एकटा मुलगा, पाहून हसतात मुली; नेमका ‘विषय’ काय?

Bihar : बिहारच्या गया जिल्ह्यात सुरू असलेल्या मॅट्रिक परीक्षेत एक अजब प्रकार घडला आहे. जिल्ह्यातील एसएमजीएस कॉलेज, शेरघाटी हे परीक्षा केंद्र केवळ विद्यार्थिनींसाठी निश्चित करण्यात आले होते. मात्र, तांत्रिक त्रुटीमुळे रॉकी कुमार नावाच्या विद्यार्थ्याला ५ हजार मुलींमध्ये परीक्षा द्यावी लागत आहे. हॉलतिकीटवर ‘Female’ लिहिल्याने गोंधळ रॉकी कुमारने परीक्षा अर्ज भरताना कोणतीही चूक केलेली नव्हती. मात्र, … Read more

stock market : परदेशी गुंतवणूकदारांचा यू-टर्न पडला महागात, शेअर बाजारात भूकंप; चीनमध्ये धिंगाना, खेळ फक्त उलटलाच नाही तर…

stock market : भारतीय शेअर बाजारातून परकीय गुंतवणूकदारांचा कल हळूहळू कमी होत आहे, तर चीनमध्ये परदेशी गुंतवणूकदारांची आवक वाढत आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत FPI (फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट) ने तब्बल १ लाख कोटी रुपयांचे स्टॉक्स विकले असून, ही विक्री अद्यापही सुरूच आहे. रुपयाची घसरण, अमेरिकन बाँडवरील वाढता परतावा आणि भारतीय कंपन्यांचे कमकुवत निकाल या घटकांमुळे गुंतवणूकदार … Read more

Infosys company : इन्फोसिस कंपनीत तुफान राडा, गेटवर बाऊन्सर्स! एकाचवेळी 400 कर्मचाऱ्यांसोबत केलं असं काही ही…

Infosys company : देशातील आघाडीच्या आयटी कंपनी इन्फोसिसने सुमारे 400 नवोदित कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये भरती करण्यात आलेल्या या कर्मचाऱ्यांना म्हैसूर येथील कॅम्पसमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. मात्र, अंतर्गत मूल्यांकन परीक्षेत अपयश आल्याचे कारण देत त्यांना कामावरून कमी करण्यात आले. कर्मचाऱ्यांचे आरोप:इन्फोसिसने घेतलेल्या मूल्यांकन चाचण्या अत्यंत कठीण होत्या … Read more

Kesari Competition : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तुफान राडा, पंचांना मारहाण; शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड 3 वर्षांसाठी निलंबित

Kesari Competition : अहिल्यानगरमध्ये पार पडलेल्या ६७व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने बाजी मारली आहे. अंतिम सामन्यात त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला पराभूत करत महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावला. अखेरच्या काही क्षणांत महेंद्र गायकवाडला चितपट करत पृथ्वीराज मोहोळने मानाची गदा उंचावली. त्याच्या विजयानंतर चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. कुस्ती मैदानात गोंधळ, पंचांवर हल्ला मात्र, या प्रतिष्ठेच्या … Read more

Kesari Prithviraj Mohol : महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळचा वडिलांना खांद्यावर घेऊन जल्लोष; पैलवान म्हणाला, घरातील…

Kesari Prithviraj Mohol : अहिल्यानगर येथे पार पडलेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने विजय मिळवत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. अंतिम सामन्यात त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला पराभूत केले. दोघांमध्ये रंगतदार कुस्ती झाली, मात्र अखेरच्या क्षणी महेंद्र गायकवाडने मैदान सोडले, त्यामुळे पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजेता घोषित केले. पृथ्वीराज मोहोळचा थरारक विजय अंतिम लढतीत … Read more

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्डसाठी कसा करायचा अर्ज? एका शेतकऱ्याला किती रुपये मिळतील? जाणून घ्या…

Kisan Credit Card : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली असून, किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेची मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा ३ लाख रुपये होती, त्यामुळे शेतकऱ्यांना आता अतिरिक्त २ लाख रुपयांचे कर्ज मिळू शकणार आहे. … Read more

Vinod Kambli : कांबळीच्या पोरांना शाळेबाहेर काढलं, फी भरायलाही पैसे नाहीत, आता ‘या’ व्यक्तीला केली विनंती

Vinod Kambli : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, आणि त्याचा फटका आता त्यांच्या मुलांनाही बसत आहे. विनोद सध्या कोणतेही काम करत नसल्याने त्याला आर्थिक स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. बीसीसीआयकडून मिळणाऱ्या फक्त ३० हजार रुपयांच्या पेन्शनवर त्याचे घर चालते. मात्र, त्याच्या कर्जबाजारीपणामुळे आणि कमाई नसल्यामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर … Read more

Andhra Pradesh : शेती करण्यासाठी माजी मुख्यमंत्र्याच्या विश्वासू खासदाराने दिला राजीनामा, राजकारणातून संन्यास

Andhra Pradesh : आंध्र प्रदेश राजकारणातील एक प्रमुख व्यक्ती आणि माजी मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांचे जवळचे विश्वासू व्ही. विजयसाई रेड्डी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांनी २५ जानेवारी २०२५ रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असलेले रेड्डी हे चार दशकांहून अधिक काळ वायएस कुटुंबाचे विश्वासू सहाय्यक … Read more

विनोद कांबळी सारखेच ‘या’ सेलिब्रिटींचे आयुष्य झाले उद्धवस्त; राजेश खन्नासह अनेक दिग्गजांचा समावेश

माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला. या व्हिडिओत तो मित्र सचिन तेंडुलकरशी हस्तांदोलन करताना थरथरत असल्याचे दिसून आले. दारूच्या व्यसनामुळे आणि आर्थिक अडचणींमुळे त्याची स्थिती गंभीर झाली आहे. उपचारासाठीही त्याच्याकडे पैसे नसल्याचे समोर आले आहे. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी एकत्र क्रिकेट करिअरची सुरुवात केली होती. कांबळी एकेकाळी भारतीय … Read more

..तर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये बंद होणार, सरकारची मोठी घोषणा

राज्यातील महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांच्या तक्रारींची छाननी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जातील, असे सांगण्यात आले आहे. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, या योजनेबाबत ते सातत्याने … Read more