Chandrapur News : चंद्रपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी रात्री आईस्क्रीम घेण्यासाठी चार वर्षांच्या मुलासह घरून निघालेली गर्भवती महिला मृतावस्थेत आढळून आली.
यामुळे याची चर्चा सुरू असून पोलीस तपास करत आहेत. तिचा ४ वर्षांचा मुलगा रात्रभर आईच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
महिलेचे नाव सुषमा काकडे असल्याचे सांगितले जात आहे. सुषमा काकडे रात्री ९ वाजता मुलगा दुर्वांश याच्यासोबत बल्लारपूर येथील टीचर्स कॉलनीतील घरातून बाहेर पडल्या होत्या. असे असताना त्या पुन्हा घरी परतल्या नाहीत.
महिलेचा पती पवनकुमार काकडे हा बँकेत कर्मचारी आहे. त्याच्या इतर नातेवाईकांनी काही काळ सुषमाचा शोध घेतला आणि नंतर बल्लारपूर पोलिस ठाण्यात संपर्क साधला. नंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
दरम्यान, पहाटे येथील नदीवरील पुलाजवळ सुषमा यांचा मृतदेह असल्याची माहिती काही लोकांनी पवन कुमार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिली. याठिकाणी गेले असता त्यांना एकच धक्कादायक बसला. याठिकाणी दुर्वांश मृतदेहाजवळ बसलेला दिसला.
नंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला असून तपास सुरू आहे. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी सर्व पैलू तपासले जात आहेत. याठिकाणी चिखलात मृतदेह आढळला आहे.