Chennai : सध्या सर्वसामान्य तरुणाच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये अचानक जमा झाल्याची प्रकरणे समोर येत आहेत. याच मालिकेत आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे, जिथे एका व्यक्तीने आपल्या मित्राला कर्ज म्हणून दोन हजार रुपये पाठवले.
त्यानंतर त्याने त्याचे खाते तपासताच त्याला धक्काच बसला. कारण त्यांच्या खात्यात 753 कोटी रुपये दिसत होते. रिपोर्टनुसार, मोहम्मद इद्रिससोबत ही धक्कादायक घटना घडली आहे. मोहम्मद इद्रिस हा फार्मसीमध्ये काम करतो.
इद्रिशने सांगितले की, त्याने कोटक महिंद्रा बँकेतून त्याच्या मित्राला 2,000 रुपये ट्रान्सफर केले होते. त्यानंतर त्यानी त्याच्या खात्यातील शिल्लक तपासली असता खात्यात 753 कोटी रुपये दिसत होते. मात्र, त्यानंतर इद्रिशने त्याच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधला असता त्याचे खाते गोठवण्यात आले.
एवढी मोठी रक्कम खात्यात जमा झाल्याची तामिळनाडूतील ही तिसरी घटना आहे. याआधी राजकुमार नावाच्या कॅब ड्रायव्हरच्या खात्यात चुकून ९ हजार कोटी रुपये ट्रान्सफर झाले होते.
राजकुमार यानी त्याच्या मर्कंटाइल बँकेला याबाबत माहिती दिली असता, चुकून ९ हजार कोटी रुपये खात्यात ट्रान्सफर झाल्याचे समोर आले. यानंतर बँकेने कॅब चालक राजकुमारच्या खात्यातून ही मोठी रक्कम ट्रान्सफर केली होती.
याशिवाय तंजावरचा रहिवासी असलेल्या गणेशन नावाच्या व्यक्तीसोबत अशीच एक घटना घडली होती, जेव्हा त्याच्या खात्यात 756 कोटी रुपये पाहून धक्काच बसला.