आईच्या अनैतिक संबंधांना वैतागली मुलं, आईच्या प्रियकराला एकांतात बोलावलं अन्…; घटनेने पोलीसही हादरले

आईबरोबर अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून चिडून दोघा भावांनी तिच्या प्रियकराचा अन्य एका महिलेसह कट रचून खून केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत करमाळा शहराजवळ उभ्या असलेल्या स्विफ्ट कारमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह करमाळा पोलिसांना आढळून आला होता.

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर करमाळा पोलिसांनी अवघ्या १६ तासांत गुन्ह्याचे धागेदोरे शोधून याप्रकरणी दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. याबाबत चौकशी सुरू आहे. करमाळा पोलिसांना एमआयडीसी शेजारील आडरानात उभ्या असलेल्या स्विफ्ट कारमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता.

पोलिसांनी आधी या मृतदेहाची ओळख पटवली. हा मृतदेह श्रावण रघुनाथ चव्हाण (रा. अडसुरेगाव, ता.येवला, जि. नाशिक) या व्यक्तीचा असल्याचे त्यांना दिसून आले. याबाबत मयताचा भाऊ संभाजी रघुनाथ चव्हाण यांकडून अधिक माहिती घेतली असता अजून माहिती समजली.

अनैतिक संबंधांतून हा खून झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने करमाळा पोलीस स्टेशनमध्ये मयताचा भाऊ संभाजी रघुनाथ चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला. यामध्ये संभाजी चव्हाण याने फिर्यादीत म्हटलं आहे की, माझे भाऊ श्रवण चव्हाण याचे आरोपींच्या आईशी अनैतिक संबंध होते.

याबाबत आरोपी सुनील शांताराम घाडगे व राहुल शांताराम घाडगे यांनी माझ्या भावाला अंदरसूल येथे सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बोलावले होते. त्यानंतर या दोघांसह एका महिलेने भावाला जीवे ठार मारून त्याच्याच स्विफ्ट कारमध्ये मृतदेह टाकून गाडीसह जाळण्याचा प्रयत्न केला.

यामुळे पोलिसांना अनेक धागेदोरे मिळत गेले. करमाळा तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील व पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी याबाबत तपास केला असता हा प्रकार समोर आला आहे.