Crime Diary : फरिदाबादच्या रस्त्यांवर भाजी विकणारा एक व्यक्ती अचानक करोडपती होतो. अवघ्या ६ महिन्यांतच त्यांच्या खात्यात २१ कोटी रुपये येतात. काही दिवसांमध्येच त्यांचे नेटवर्क सिंगापूर, चीन आणि हाँगकाँगपर्यंत पोहोचले. यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की फरिदाबादचा हा भाजी विक्रेता करोडपती झाला कसा? याची चर्चा सध्या रंगू लागली.
या व्यक्तीचे नाव ऋषभ शर्मा असे आहे. त्यांचा भाजी आणि फळ विकण्याचा धंदा होता. असे असताना कोरोना आला आणि सगळं संपलं. यामुळे उपासमारीची वेळ आली. परिस्थितीशी लढण्यासाठी ऋषभ यांनी नवा मार्ग आखला. मात्र तो चुकीचा मार्ग होता.
दरम्यान, भाजीचे दुकान बंद झाल्यावर त्यांनी एक भलताच प्लान आखला. एक मित्र त्याला भेटला आणि दोघांनी मिळून एक हॉटेल वेबसाइट सुरू केली. मात्र यामध्ये काहीच नव्हते. या हॉटेलचे नाव मॅरियट बोनवॉय हॉटेल असे होते.
नाव दिलं मात्र असं कोणत हॉटेलच नव्हते. वेबसाइटवर ते एक अतिशय आलिशान परदेशी हॉटेल असल्याचे दिसून आले. त्यांनी डोकं लढवून ही वेबसाईट खूपच आकर्षक केली. यावर कोणाचीही फसवणूक होईल, असे काहीसे केले.
दरम्यान, त्यांनी लोकांचे फोन नंबर गोळा केले. कोरोना काळात लोक घरीच होते. लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. याचा फायदा या भाजी विक्रेत्याने घेतला. त्यांनी वैयक्तिकरित्या लोकांशी संपर्क साधला. त्यांना वेबसाइटबद्दल माहिती दिली. जर त्यांनी या हॉटेलच्या स्तुतीसाठी चांगले रिव्ब्यू लिहिला तर त्यांना १०,००० रुपये मिळतील, असे सांगितले.
तो लोकांना १०,००० रुपयेही देत होता. लोकांचा त्याच्या कामावरचा विश्वास वाढू लागला. या हॉटेलमध्ये गुंतवणूक करण्याचा हा मार्ग होता. या वेबसाइटला खूप चांगले रिव्ह्यू आले होते. यामुळे यामध्ये लोकं अडकत गेले. गेल्या ३ वर्षांपासून हा काळा धंदा सुरू होता.
दरम्यान, या भाजी विक्रेत्यावर ६३० गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनीमाहिती काढल्यावर समजले की तो सध्या गुरुग्राममध्ये राहत आहे. त्यांचे बँक खातेही गुरुग्राममधील एका बँकेत आहे. पोलिसांनी छापा टाकून त्याला गेल्या आठवड्यात अटक केली आहे.