Crime News:ट्रेनमध्ये झोपलेल्या 22 वर्षीय तरुणीच्या तोंडाजवळ जाऊन त्याने पॅण्टची चैन उघडली अन्..; धक्कादायक प्रकार आला समोर

Crime News: गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. एक महिला तिच्या मित्रमैत्रीणींबरोबर गोव्याला जात होती. यावेळी एका व्यक्तीने धावत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये 22 वर्षीय महिला प्रवाशाबरोबर गैरवर्तवणूक केली. एका व्यक्तीने ट्रेनमध्ये झोपलेल्या महिलेच्या चेहऱ्यासमोर हस्तमैथुन केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी म्हणजेच 2 जानेवारी 2024 रोजी एक तरुणी केरळमधून तिच्या काही मित्रमैत्रीणींबरोबर गोव्याला परत येत होती. त्यावेळी महिला झोपली असताना आरोपी तिच्या जवळ आला आणि तिच्या चेहऱ्यासमोर हस्तमैथुन करू लागला.

तरुणीच्या सोबत प्रवास करणाऱ्या दोन पुरुष मित्रांनी हे कृत्य पाहिले. त्यांनी आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला. त्यानंतर त्यांनी ही सर्व माहिती पोलिसांना दिली. अखेर पोलिसांनी त्या आरोपीवर कारवाई केली.

आरोपीचे नाव दत्तात्रेय चव्हाण आहे. तो महाराष्ट्रातील असून, तो केरळ येथे काम करतो. या घटनेबाबत इन्स्पेक्टर सुनील गुडलर यांनी सांगितले की, “22 वर्षीय महिला पूर्णा एक्स्प्रेसमध्ये तिच्या दोन पुरुष मित्रांसह प्रवास करत होती, जे तिच्याच वयोगटातील होते.

त्यांनी पुढे सांगितले की, “हे सर्वजण सिनेमॅटोग्राफीच्या व्यवसायात आहेत. काही व्हिडिओ शूट करण्यासाठी केरळहून गोव्याला जात होते.” पोलिसांनी सांगितले की, “महिला केरळमधील कोझिकोड येथील रहिवासी आहे.” या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहोत.

या प्रकरणामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. महिलांनी ट्रेनमध्ये प्रवास करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच, जर कोणी असे अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असेल तर लगेच पोलिसांना संपर्क साधावा.