Crime News : धक्कादायक! मॅगी खाल्ल्यानंतर झाला नववीतील विद्यार्थीनीचा मृत्यू ? नेमकं काय घडलं..

Crime News : मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातून एक काळजी चिरणारी बातमी समोर आली आहे. एका मुलीचा मॅगी खाल्ल्यानंतर मृत्यू झाला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना ७ जानेवारीला घडली. लहान मुलीच्या मृत्यूवमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

रिया साहू (वय १५) ही इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी होती. तिने घरी बनवलेली मॅगी खाल्ल्यानंतर तिची तब्येत बिघडली आणि काहीच वेळात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

झालं असं की, रियाला मॅगी खूप आवडायची. ती ट्यूशनवरून घरी आली तेव्हा तिने आईला मॅगी खायची असल्याचे सांगितले. आईने तिला जेवण करायला सांगितले, पण रियाने हट्ट धरला आणि मॅगी बनवली. तिने मॅगी खाल्ल्यानंतर तिला पोटदुखी, उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला.

कुटुंबीयांनी तिला सेमरिया सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले, पण डॉक्टरांनी तिला रीवा येथे नेण्यास सांगितले. रियाला रीवा येथील संजय गांधी रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला.

या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. रियाच्या आईला तिच्या मृत्यूचा खोलवर धक्का बसला आहे. तसेच तिच्या कुटुबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रियाच्या आईला आयुष्यभराचा पश्चाताप होत आहे की, तिने रियाला मॅगी बनवण्यास का परवानगी दिली.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्यांनी रियाच्या कुटुंबीयांकडून माहिती गोळा केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मुलीच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. कदाचित मॅगी एक्सपायरी डेटची असावी असाही संशय पोलिसांना व्यक्त केला आहे. या घटनेमुळे मॅगी खाण्याचा धोका हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.