Crime News: माता न तू वैरीणी..! जन्मदात्या आईनेच केला ४ वर्षांच्या मुलाचा खून; सीईओला फिल्मी स्टाईलने अटक

Crime News: एका प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये जन्मदात्या आईनेच मुलीचा खून केली आहे. आरोपी महिला बगळुरुमधील एका स्टार्टअप कंपीत सीईओ पदावर कार्यरत आहे. या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महिलेच हे कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. (Goa Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूचना सेठ (Suchana Seth) असं या महिलेचं नाव आहे. शनिवारी तिने नॉर्थ गोवामधील सोल बनयान ग्रांदे या हॉटेलमध्ये चेक-इन केलं होतं. यावेळी तिच्यासोबत तिचा चार वर्षांचा मुलगाही होता. सोमवारी सकाळी तिने हॉटेलच्या स्टाफला टॅक्सीची मागणी केली.

बंगळुरूला जाण्यासाठी तिला टॅक्सीने प्रवास करायचा होता. हॉटेलच्या स्टाफने तिला विमानाने प्रवास करण्याची सल्ला दिली, मात्र तिने टॅक्सीचीच मागणी केली. तिने रुम सोडल्यानंतर जेव्हा क्लीनिंग स्टाफ तिच्या रुममध्ये गेला, तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग दिसून आले. त्यांनी तातडीने पोलिसांना कळवलं.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. त्यांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, सूचना सेठ यांनी जेव्हा हॉटेल सोडलं, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा नव्हता हे आढळून आलं. पोलिसांनी टॅक्सी ड्रायव्हरला शोधून काढला आणि त्याच्याकडून माहिती घेतली.

ड्रायव्हरने सांगितलं की, सूचना सेठ यांनी त्यांना चित्रदुर्ग जिल्ह्यात नेण्याची विनंती केली होती. गोवा पोलिसांनी चित्रदुर्ग पोलिसांना माहिती दिली. चित्रदुर्ग पोलिसांनी टॅक्सी थांबवून सूचना सेठ यांना ताब्यात घेतलं. त्यांच्या बॅगेत त्यांच्या मुलाचा मृतदेह सापडला.

पोलिसांनी सूचना सेठ यांना गोव्याला आणलं आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेने गोव्यामध्ये खळबळ उडाली आहे. एका महिलेने स्वतःच्याच मुलाची हत्या केल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.