Crime news : विवाहबाह्य संबंधात पती ठरत होता अडसर, बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला काटा, संशय येऊ नये म्हणून…

Crime news : पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. ही घटना कल्याण आडीवली भागात घडली आहे. पतीची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह दगड बांधून विहिरीत टाकून देण्यात आला होता.

पोलिसांनी या सगळ्या गुन्ह्याचा तपास करत आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. यामुळे या घटनेमुळे सगळेच हादरले आहेत. चंद्रप्रकाश लोवंशी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

त्यांची पत्नी रीता लोवंशी आणि तिचा प्रियकर सुमित विश्वकर्मा या दोघांनी चंद्रप्रकाश याच्या हत्येचा कट रचला होता. कोणाचाही आपल्यावर संशय येऊ नये म्हणून रिताने काही दिवसांपूर्वीच चंद्रप्रकाश बेपत्ता असल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. यामुळे पोलीस तपास सुरू केला होता.

पत्नी आणि तिचा प्रियकर हे चार महिन्यांपासून कट रचत होते. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी पतीचा शोध घेण्यास सुरूवात केली होती. या घटनेला काहीच दिवस उलटत नाहीत तोच कल्याण ग्रामीण परिसरातील अडीवली गावातील विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता.

यामुळे पोलिसांनी हा घातपात तर नाही ना, या दृष्टीने तपास सुरू केला. तपासानंतर मृतदेहाला दगड बांधून विहिरीत ढकलण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे यामागे कोणाचा तरी हात असल्याचं पोलिसांना दिसून आले.

मृतदेहाच्या गळ्यावर वार देखील करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे मानपाडा पोलिसांना या व्यक्तीची हत्या करून त्याला विहिरीत ढकलून दिल्याचा संशय आला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू केलं. 

दरम्यान, पोलिसांनी त्याची पत्नी रिता हिची चौकशी सुरू केली. सुरुवातीला तिने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना तिच्यावर संशय आला. त्यानंतर तिने तिचा प्रियकर सुमित विश्वकर्माचे नाव सांगितले. पोलिसांनी तात्काळ सुमित विश्वकर्माला ताब्यात घेतले.