Crime News : धक्कादायक! हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर भुंग्यांचा हल्ला; नातवंडाच्या डोळ्यांसमोर तडफडून मृत्यू

Crime News : बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भुंग्यांनी चावा घेतल्याने हवाई दलाच्या अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे सगळेच हादरून गेले आहेत.

याबाबत माहिती अशी की, रणजीत कुमार असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून तो चंदिगडमध्ये हवाई दलात मास्टर वॉरंट ऑफिसर म्हणून कार्यरत होता. तो दोन दिवसांपूर्वीच रजेवर घरी आले होता.

रणजीत कुमार हा बुधवारी सकाळी द्रोणपूर येथील त्यांच्या घराबाहेर बसला होता. त्याची नातवंड घराबाहेरच खेळत होती. अचानक, भुंग्याच्या थव्याने रणजीत यांच्यावर हल्ला केला. संपूर्ण अंगावर ते चावू लागला. यावेळी रणजीतला काय करावे समजेनास झाले.

रणजीत यानी त्यांच्या नातवंडाना कसेबसे घरात नेले. मात्रप तोपर्यंत भुंग्यांच्या थव्याने त्याचा चेहरा, हात, पाय आणि शरीराचे इतर उघडे भाग चावून घेतले. त्यामुळे तो प्रचंड जखमी झाले होते. वेदनेमुळे तो मोठमोठ्याने औरडू लागला. रणजीत वेदनेने तडफडू लागला आणि थोड्याचे वेळात बेशुद्ध होऊन धाडकन खाली पडला.

जखमी रणजीत याला कुटुंबीयांनी तातडीने श्रीकृष्ण मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

स्थानिक लोकांनी सांगितले की, भुंग्यांशी लढताना रणजीत कुमार यांनी त्यांच्या नातवंडांना वाचवले. या घटनेमुळे परिसरात भुंग्यांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक आता घराबाहेर बसायला किंवा बाहेर पडायलाही घाबरत आहेत.