Crime News : इन्स्टाग्रामवर झाली ओळख, तरुणीने केलं ब्लॉक, पुढे जे घडलं ते खूपच भयानक होत, तरुण थेट घरात….

Crime News : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील पुंडलिकनगर भागातील मुलीची काही महिन्यांपुर्वी इन्स्टाग्रामवर एका तरुणाशी ओळख झाली. नंतर काही दिवसांनी या तरुणीने तरुणाला ब्लॉक केले. यामुळे त्याला राग आला.

ब्लॉक केल्याचा राग मनात धरून समाजमाध्यमावरील मित्र तरुणीच्या घरात घुसला. तिच्यासोबत गैरकृत्य करून घरात तोडफोड करून दगडफेक केली. या प्रकरणी पवन ईश्वरलाल जैस्वाल व त्याच्यासोबत पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत.

ऑगस्टमध्ये तरुणीची ओळख पवन जैस्वाल याच्यासोबत इन्स्टाग्रामवर झाली होती. दोघेही जण एकमेकांचे व्हिडिओ लाइक करायचे. नंतर पवन याने तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केली. यामुळे तिला हे खटकले तरुणीने त्याला ब्लॉक केले. यामुळे हा तरुण चिडला.

नंतर तरुणाने ती राहत असलेल्या ठिकाणी पवन जैस्वाल तिच्या घरासमोर चकरा मारू लागला. एके दिवशी पवन जैस्वाल काही तरुणांसह तरुणीच्या आशानगर भागातील घरात घुसले. याठिकाणी त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.

पवन याने तिचा विनयभंग केला, तसेच तिला लग्न करण्याचा आग्रह केला. त्याचप्रमाणे त्याच्या मित्रांनी तिला चाकूने धाक दाखवून घरात तोडफोड केली. यामुळे तरुणी खूप घाबरली होती. या मुलांनी दरवाजे आणि खिडकीच्या काचा फोडून नुकसान केले.

पवन जैस्वाल व त्याच्या मित्रांनी घरावर व खिडकीवर मुलीच्या परिवाराला मारण्यासाठी दगडफेकही केली. यामध्ये मुलीच्या आई व बहीण या दोघी जणी जखमी झाल्या आहेत. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.