Crime News: महिलेने ग्रामसेवकाच्या तोंडात घुसवली चप्पल, मारहाण करत उचलून आपटलं अन्…; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Crime News: उत्तर प्रदेशातील बांदा येथे ग्रामसेवकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ग्रामपंचायतीमध्ये साफ-सफाई काम करणारी महिला आणि तिचा पती या दोघांनी ग्रामसेवकाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महुआ तालुक्यातील खरोंच गावात ग्रामसेवक रोहित पटेल सरकारी कामावर होते. यावेळी, ग्रामपंचायतीमध्ये साफ-सफाई काम करणारी महिला रेखा आणि तिचा पती विजय पटेल हे आले होते. महिलेने गेल्या चार महिन्यातील आपल्या कामाचे पैसे मागितले. यावर ग्रामसेवक आणि महिलेमध्ये वाद झाला.

वाद वाढताच महिलेने पतीसह ग्रामसेवकाला मारहाण केली. या मारहाणीत ग्रामसेवक जखमी झाले. ग्रामसेवकाने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी महिले आणि तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामसेवकाला मारहाण करणे हा गंभीर गुन्हा असून त्यावर कारवाई करण्यात आली आहे. महिलेमे ग्रामसेवकाला महिलेने आधी चप्पलेने मारहाण केली आणि नंतर उचलून खाली आपटले.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मारहाणीत ग्रामसेवक रोहित पटेल गंभीर जखमी झाले.ग्रामसेवक रोहित पटेल यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

ग्रामसेवकाने दिलेल्या तक्रारीत म्हटले की, मी सरकारी काम करत असताना मला मारहाण करण्यात आली. सरपंच आणि एक दाम्पत्य ग्रामपंचायतीमध्ये आले. त्यांनी माझ्याकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर, मला शिवीगाळ करत माझे कपडेही फाडले आणि मला बेदम मारले.