Crime News : मुलीच्या दोन मित्रांना घरी बोलवायची महिला, पतीने विरोध करताच रचला भयंकर कट; कल्याणमध्ये घडलं भयंकर

Crime News : कल्याणमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी पत्नीने पतीला जिवंत जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पोलीस सध्या तपास करत आहेत.

येथील 61 वर्षांच्या पतीला पेन्शनच्या पैशांसाठी आगीच्या हवाली करण्याचा कट एका महिलेने रचला. घटनेनंतर पीडित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. पत्नीनेच पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे.

याबाबत अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी याबाबत तपास केला असता धक्कादायक घटना समोर आली. पतीने मुलीच्या मित्रांना घरी येण्यास विरोध केल्यानंतर  महिलेने त्यांच्यासोबत मिळून हा धक्कादायक हत्येचा कट रचला.

दरम्यान, पतीच्या पेन्शनसाठी पतीच्या हत्येचा कट रचला आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. याबाबत माहिती अशी की, रात्री तिने मुलीच्या दोन मित्रांना घरी बोलवले होते. यानंतर त्यांनी महिलेच्या पतीवर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली.

नंतर गोंधळ झाल्याने शेजाऱ्यांनी येऊन पाहिले तेव्हा लगेचच येऊन आग विझवली आणि पीडित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. नंतर पोलिसांनी याठिकाणी येऊन तपास केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सध्या पतीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी महिलेसोबत अन्य दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपी हे पीडित व्यक्तीच्या मुलीचे मित्र आहेत. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस तपास सुरू आहे.