Crime News : हृदयद्रावक! KGF फेम यशच्या वाढदिवसादरम्यान घडली भयानक घटना, ३ चाहते जागीच ठार

Crime News: साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार यश सोमवारी, ८ जानेवारी रोजी ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. यशचे चाहते त्याच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या उत्साहात आहेत. पण हा उत्साह साजरा करण त्याच्या चाहत्यांना महागात पडल आहे. यशच्या वाढदिवसानिमित्त त्याचे कटआउट लावताना विजेचा धक्का लागून तीन चाहत्यांचा मृत्यू झाला आहे.

झालं असं की, कर्नाटकातील गडग जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. यशचे चाहते उत्साहात होते. मात्र, यशच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. यशच्या वाढदिवसानिमित्त त्याचे कटआउट लावताना विजेचा धक्का लागून तीन चाहत्यांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

यशच्या चाहत्यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त गडग जिल्ह्यातील एका चौकात त्याचे कटआउट लावले होते. जिथे ते कटआउट लावत होते तिथे विजेच्या तारा जवळच होत्या. त्यावेळी त्यांचा धक्का विजेच्या तारेला लागला. या अपघातात तीन चाहत्यांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातामुळे संपूर्ण गडग शहरात शोककळा पसरली आहे. यशचे चाहते या घटनेने हताश झाले आहेत. यशनेही या घटनेबद्दल ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. यश हा दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे लाखो चाहते आहेत. यशच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते अनेक ठिकाणी कटआऊट लावतात आणि त्याच्या चित्रपटांची स्क्रीनिंग करतात.

यशच्या वाढदिवसाला झालेल्या या दुर्घटनेत त्याच्या चाहत्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. यशच्या चाहत्यांनी या घटनेबद्दल सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी यशच्या चाहत्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, यश हा कर्नाटकातील एक लोकप्रिय अभिनेता आहेत. त्यांने २००७ मध्ये जंबडा हुडुगी या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तो रॉकी, गुगली, मि. आणि सौ. रामाचारी, KGF Chapter 1 आणि KGF Chapter 2 या चित्रपटांमध्ये झळकला. यशच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.