जमिनीखालून येत होता विचित्र आवाज, नंतर जे समोर आलं ते पाहून सगळेच हादरले; पहा भयानक व्हिडिओ

नदी, तलावातील सर्वात भयानक प्राणी म्हणजे मगर. मगरीमुळे लोकांना पाण्याजवळ जाण्याचीही भिती वाटत असते. कधी कधी तर मगर ही जमिनीवर सुद्धा येते. पण आता सध्या एक विचित्रच व्हिडिओ सोर आला आहे.

तो व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. त्यामध्ये मगर चक्क जमिनीखाली आढळून आली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक जमिन खोदत असतात. त्यावेळी एक मगर जमिनीखालून येते.

त्यावेळी लोक त्या मगरीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण तितक्यात आणखी दोन मगर त्यातून बाहेर येतात. त्यामुळे तिथे एकच खळबळ उडते. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ भारतातीलच आहे. पण तो नक्की कुठला आहे हे अजून समोर आलेले नाही.

रस्त्यावर खालून काहीतरी विचित्र आवाज येत असतात. असे वाटते की दोन प्राणी लढाई करत आहे. त्यामुळे तिथे नक्की काय आहे हे पाहण्यासाठी जमीन खोदली जाते. तेव्हा अचानक एक मगर खालून वर येते. त्यामुळे तिथे असलेले लोक अवजारांच्या साहाय्याने तिला पकडत असतात.

ते तिला पकडत असतानाच दोन आणखी मगर तिथे खाली असतात. त्यातलीही एक मगर वर येते आणि ती रस्त्यावर चालू लागते. त्यामुळे तेथील नागरिकांची घाबरगुंडी उडते. त्यातला एक नागरिक तर थेट पाईपवरच चढून जातो.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. आतापर्यंत दहा लाख लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे. तर ५० हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. हा व्हिडिओ खुपच भितीदायक असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.